खा. गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा Print

यवतमाळ / वार्ताहर
आर्णी व परिसरातील विविध मागण्यांसंदर्भात आज शुक्रवारी दुपारी ११ वाजता शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यातील मुख्य समस्या नगर परिषदसंदर्भात असल्याचे पत्रकातून स्पष्ट झाले आहे.  मोर्चाचे नेतृत्व खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार करणार असल्याचे तालुका शिवसेनाप्रमुख रमेश ठाकरे व शहरप्रमुख संजय उपलेंचवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. १९ कोटींची पाणीपुरवठा योजना, घरकुलांचा प्रश्न, पुनर्वसन, मुद्रांक शुल्कात केलेली वाढ, आर्णीचा विकास आराखडा मंजूर करणे, अशा एकूण १७ समस्यांसाठी हे आंदोलन होणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.