विष प्राशन केल्याने ७ तर जट्रोफामुळे ४ अत्यवस्थ
|
|
बुलढाणा / प्रतिनिधी विविध ठिकाणी विष प्राशन केल्यामुळे सात जणांना, तर जट्रोफा बिया खाल्ल्याने चार बालकांना अत्यवस्थ अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेंभूर्णा येथील शेषराव तेजराव मोरे (२०), कैलास तेजराव इंगळे (२६), जळका भडंग येथील सुनीता शेषराव दाभाडे (३५), वाडी महाळुंगी (ता. नांदुरा) येथील दखाराम लेलाराम गव्हाळे (३५) यांना काल संध्याकाळी ७ ते रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान,
तसेच शोभा रामेश्वर चतरकार (३२), दगडू अवधूत चतरकार (६५, दोन्ही रा. पिंप्री गवळी ता. खामगांव), किसन हातेकर (३५, रा. जळगाव (जा.) यांना विष प्राशनामुळे आज दुपारी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर जट्रोफाच्या बिया खाल्ल्यामुळे टाकळी तलाव येथील पंकज दीपक इंगळे (४०), यश बाळू इंगळे (३), सतीश बाळू इंगळे (५) व कल्पेश युवराज इंगळे (६) या चार बालकांना काल दुपारी १२.१५ वाजता सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. |