रमेशचंद्र मुनघाटे यांना श्रद्धांजली Print

गडचिरोली / वार्ताहर
स्थानिक फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार होते. प्रा. पी. एस. वनमाळी, प्रा. व्ही. एस. गोर्लावार, प्रा. वाय. आर. गहाणे, प्रा. एस. आर. बुटले, प्रा. आर. आय. गौर, प्रा. ए. व्ही. कुकडे, प्रा. के.व्ही. कुडे, प्रा. डी. के. बारसागडे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. खंगार म्हणाले, रमेशचंद्र मुनघाटे यांनी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. या वेळी उपस्थित मान्यवरांनीही दिवं. मुनघाटे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गहाणे यांनी केले.