चारित्र्यवान विद्यार्थी घडवा -फौजिया खान Print

अकोला / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद व महात्मा गांधी यांची शिकवण आत्मसात करून जय बजरंग बालगृहातून चारित्र्यवान विद्यार्थी निर्माण व्हावे, असे आवाहन राज्याच्या माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले. अकोल्यात नुकताच त्यांचा दौरा झाला या वेळी त्यांनी भेट दिली होती. जय बजरंग कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह हिंगणा कुंभारीच्या ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी कार्यक्रमास विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिरकड, डॉ. जगन्नाथ ढोणे, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायण गावंडे, दिलीप आसरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.