सालेकसातील ४० नागरिकांवर गुन्हा Print

गोंदिया / वार्ताहर
सालेकसा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर एक ऑक्टोबर रोजी संतप्त नागरिकांनी भारनियमन विरोधात हल्लाबोल करून सहायक अभियंत्याला धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी सहायक अभियंता सचिन कांबळे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी कुलतारसिंग भाटिया, हरिणखेडे, श्रीवास्तव, रमेश फुंडे व इतर अशा ४० नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. महावितरणाचे अभियंत्यांना ज्यांची ओळख पटली त्यांचे नाव पोलिसांना सांगितले, पण यात आणखी नेमके कोण कोण सहभागी आहेत, याची शहानिशा करून पोलीस त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सालेकसाचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. पुढील तपास पोलीस हवालदार देवारी करीत आहेत.