कारवाफा आश्रमशाळा क्रीडा संमेलनात अव्वल Print

गडचिरोली / वार्ताहर
आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कारवाफा केंद्रस्तरीय तीनदिवसीय क्रीडा संमेलन चांदाळा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत पार पडले. यात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले, तर पोटेगाव आश्रमशाळा उपविजेती ठरली. या संमेलनात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी येथील शासकीय, तर चांदाळा, गट्टा, कामनगड येथील अनुदानित आश्रमशाळेच्या १५ व १९ वर्षे वयोगटाखालील सुमारे ३५० खेळाडूंनी विविध खेळांत भाग घेतला होता. कारवाफा संघाने उल्लेखनीय कामगिरी करून छाप पाडली. यासाठी प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, केंद्रप्रमुख व्ही. वाय. भिवगडे, मुख्याध्यापक लांजेवार, प्राचार्य भोयर, मुख्याध्यापक तोतडे, सुधीर शेंडे, एस. एस. पवार, के. सी. पटले, एम. ए. बोरेवार, एम. जे. खोब्रागडे, पी. एस. रिघनाथे, अनिल सोमनकर, के. जी. गेडाम, जे. एम. नैताम, ए.पी. इष्याम, मारोती कुरवटकर, एन. एम. हजारे, एस. के. सोनटक्के, एस. डब्ल्यू मेश्राम, जे. बी. सेलोकर आदींनी परिश्रम घेतले.