नवरात्रीतील ‘धूपन’ आणि आयुर्वेद Print

alt

कालपासून घटस्थापना झाली. या नऊ दिवसांत घरोघरी देवीची आरती करताना सुगंधी, रक्षोघ्न धूप जाळले जातात. हे धूप औषधी वनस्पतीचा गोंद, निर्यास, डिंक या स्वरूपाचे असतात. यात गुगुळ, धूप, राळ, गंधविजोरा अगरू, लोबान, शल्लकी, कापूर असे सुगंधी, कृमिनाशक, उद असतात. आयुर्वेदात याला रक्षोघ्न गणातील धूपन द्रने म्हणतात. आयुर्वेदशास्त्राचे प्रणेते आचार्य सुश्रूतांनी याचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
आचार्य सुश्रूत हे स्वत: शल्यचिकित्सक असल्याने शुचिर्भूततेचे त्यांना अतिशय महत्त्व होते. त्यांनी आणि आयुर्वेदाचे निर्माते आचार्य चरकांनी परिसर शुद्धीसाठी, व्रणशुद्धीसाठी व शल्पगृह शुद्धीसाठी गुगुळ, अगरू, शल, वचा, पांढरी मोहरी, लवण, निम्बपत्र, धृत, एकत्र करून किंवा एकएकटे मिसळून धूपन करण्यास सांगितले आहे. याशिवाय, लसूण, हिंग, वेखंड, जटामांसी, सर्पगंधामुळ, गुळवेल, खाजकु हिली, तसेच सूतिकागार शुद्धीसाठी रवदिर, बोर, पीलु, सर्षव, जवस, बकुळ, वचा, हिंग, लसूण अशा र्निजतुकीकरण करणाऱ्या वेगळ्या वनस्पतींचा धूपनासाठी वापर करायला सांगितला आहे. एकंदर काय, तर धूप जाळून वातावरण परिसर शुद्ध होते, हे तीन हजार वर्षांपूर्वीपासून मान्य आहे. आयुर्वेदशास्त्राने त्याचा उपयोग व प्रसार केला आहे. वैज्ञानिकदृष्टय़ा नवरात्राचा काळ म्हणजे संधिकाळ असतो. पाऊस संपतो व थंडीला सुरुवात होत असते. या काळात डास, कातिंग, मुंग्या, झुरळ असे उपद्रवी षडपद जिवांची संख्या झपाटय़ाने वाढत असते. त्यापासून वातावरण दूषित होऊ नये, रोगराई वाढू नये म्हणून धूप जाळले जातात.
चिकनगुनिया, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, मलेरिया, डेंग्यू असे विकार या दिवसांत पसरलेले असतात. यावर नियंत्रण मिळवून वातावरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी रक्षोघ्न धूपाचा उपयोग करणे हिताचेच आहे. यासाठी नैसर्गिक सुगंधी वनस्पतीक उदाचा उपयोग केल्यास उत्तमच. यासाठीच आयुर्वेदशास्त्रात (गुगुळ, राळ, उद, लोबान, गंधबीजोरा, अगरु, कुन्दरु, वचा कापूर) अशी रक्षोघ्न द्रव्य धूपन म्हणून वापरल्यास फायद्याचेच आहे. या सर्व सुगंधी वनस्पती असल्याने घर, मंदिर, समाजातील वातावरण मंगलमय होते. वरील सर्व वनस्पतीचे गोंद किंवा निर्यास, िडक स्वरूपातील असल्याने वनस्पतीच्या संरक्षणावर कुठलीही आपत्ती येते नाही. उलट, भरपूर गोंद मिळण्यास वनस्पतींचे संवर्धनच करावे लागते. अशा प्रकारे मंगलमय व र्निजतुक वातावरण करणाऱ्या विशेषत: नवरात्रीत वापरण्यात येणाऱ्या धूपन वनस्पतीची आपण शास्त्रशुद्ध औषधोपयोग माहिती उद्याच्या अंकापासून पाहणार आहोत.
 डॉ. माधुरी वाघ -९४२२१०९९९३