अफूची अवैध साठवणूक करणाऱ्या फरारीस अटक Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
अफूची अवैध साठवणुकीप्रकरणी दोन महिन्यांपासून फरार असलेले विकास पुंडलिक कहाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
परिविक्षाधीन पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी गांजा तस्करीप्रकरणी अजितसिंग गिल याला अटक केली होती. अजित सिंगने सदर अफू गोल बाजारातील कहाळे रेडिमेड स्टोअर्सचे संचालक विकास कहाळे यांच्या गोदामातील असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारावर कहाळे यांच्या गोदामावर धाड टाकली असता साडेपाच लाखांचा अफूचा माल मिळाला. याप्रकरणी पोलिसांनी कहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यानच्या कालावधीत कहाळे फरार झाले. त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांचा जामीन फेटाळून लावण्यात आला. यानंतर आज कहाळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.