सुभाषग्राम येथे १२ हजारांचा गुटखा जप्त Print

गडचिरोली/ वार्ताहर
नागरिकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या गडचिरोली येथील पथकाने चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील लक्ष्मी किराणा स्टोअर्सच्या गोदामावर छापा टाकून १२ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.  अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त वाय. के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गेडाम, सोयाम यांनी चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील गोपाल रॉय यांच्या मालकीच्या लक्ष्मी किराणा स्टोअर्सच्या गोदामावर छापा घालून सीतार, धमाल व टायगर ब्रँडचा ११ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. जिल्ह्य़ात असे काही आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना द्यावी, असे आवाहन साहाय्यक आयुक्त (अन्न) यांनी केले आहे.