डॉ. राकेश बडगुजर आंतरराष्ट्रीय पंच Print

अकोला / प्रतिनिधी
मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयातील प्रा. डॉ. राकेश बडगुजर यांची आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच म्हणून निवड झाली आहे. इराण येथे झालेल्या चाचणीत त्यांची निवड केली गेली. विदर्भातून ते एकमेव आहेत.
शालेय, महाविद्यालयीन स्पर्धेत डॉ. बडगुजर यांनी नऊ सुवर्ण, तीन रजत पदके प्राप्त केली होती. नॅशनल प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या त्यांनी पूर्ण केले. सात वेळा आंतरविद्यापीठ स्पर्धेचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. भारतीय पारंपरिक कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना इराणला झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते. फिलाचे अध्यक्ष व्हिलेटा यांनी त्यांची निवड केली. ख्यातनाम मल्ल अमरचंद बडगुजर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके, अ‍ॅड. सुहास तिडके यांना दिले आहे.