माहूर, केळापूरला उसळला भाविकांचा सागर Print

यवतमाळ / वार्ताहर
दुर्गोत्सवासाठी विर्दभात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देविच्या मंदीरात आणि केळापुरच्या जगदंबा दविच्या दर्शनासाठी हजारे भाविकांची दररोज प्रचंड गर्दी उसळत आहे. माहुर येथे रेणुका देवीचे 300 वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाळपंथी मंदिर आहे तसेच माहुर गडावर माहानुभावपंथी दत्त मंदिर तसेच परशुराम मंदिर तसेच महासती अनसूया मंदिर असल्याने भावीकांची या निर्सगरम्य परिसरात प्रचंड गर्दी उसळलेली आहे.
माहुरचा बाबा सोनापिरचा प्राचीन दर्गासुध्दा प्रसिद्ध आहे शिवाय पांडव लेणी आणि शेखफरीद दरगाहने माहूर गडाला सर्वधर्मीय तीर्थस्थळाचे स्वरुप आले आहे हजारो भाविकांची रेणुकेच्या दर्शनासाठी गर्दी होत असल्याने आणि देवीच्या साडेतीन पीठांपकी एक पूर्ण पीठ माहुरची रेणुका असल्याने भक्तांची वर्दळ मोठया प्रमाणात होत आहे .त्यामुळे सोई-सुविधांची पूर्तता करणे मंदिर व्यवस्थापनाला कठीण जात आहे.
 विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. माहूरच्या विकासासाठी एक विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्यासाठी जवळपास ८० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. केळापूरच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी विर्दभ  मराठवाडयातुन नव्हे तर आंधप्रदेशातुन सुध्दा हजारो भाविक जगदंबेच्या दर्शनासाठी येत आहेत.
यवतमाळ जिल्हयातील अनेक ठिकाणी दुर्गोत्सवाची मोठया प्रमाणात धामधुम सुरु असुन यवतमाळ तर चौका चौकात प्रचंड सभा मंडप उभारुन देवीची  स्थापना  करण्यात आली आहे.