लिंगनिदानाचा आग्रह करणाऱ्या सासू-सासऱ्यांनाही शिक्षेची तरतूद Print

वर्धा / प्रतिनिधी
गर्भलिंग निदान करणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासह तिच्या सासू-सासऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची तरतूद प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियमाअंतर्गत आता करण्यात आली आहे. आयएमएच्या सहकार्याने संस्थेच्या सभागृहात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रसवपूर्व निदानतंत्र विनियमन आणि दुरूपयोग प्रतिबंधक अधिनियमाबाबत मार्गदर्शन झाले. या कायद्याअंतर्गत असणाऱ्या विविध तरतुदींबाबत अवगत करतानाच गर्भवती महिलेच्या कुटुंबानेही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कुटुंबात नवजात मुलांप्रमाणे मुलींचे स्वागत करण्याची मानसिकता नाही. या पाश्र्वभूमीवर ‘बेटी बचाव ‘ अभियानास प्रारंभ करण्यात आला. कार्यशाळेत सर्व सोनोग्राफी केंद्रधारक, प्राधिकरण व तज्ञ अधिकाऱ्यांना यावेळी आयएमएच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद सोनोने यांनी नमूद केले की वर्धा जिल्हयात दरहजारी पुरू षांमागे स्त्रियांचे प्रमाण ९३९ एवढे आहे. २००१ मधे हेच प्रमाण ९३६ तर २०११ मधे ९४६ एवढे वाढले. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत या प्रमाणात घट झाली आहे. मुलींचे प्रमाण जिल्हयात कमी असण्याच्या पाश्र्वभूमीवर सोनोग्राफी कें द्राची आकस्मिक तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. केंद्रधारकांनी त्यामुळे अधिनियमाअंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करावे व केंद्रात ठळकपणे त्याचे माहितीफ लक लावावे, असे डॉ. सोनोने यांनी सुचविले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत दक्षतापथक स्थापन करण्यात आले असून पथकातील ५९ यंत्रणा केव्हाही आकस्मिक भेट देवून केंद्राची पाहणी करू शकतात. असे आयएमए वध्र्याचे अध्यक्ष डॉ. सुनील महाजन यांनी निदर्शनास आणून गर्भलिंग तपासणी करणारे डॉक्टर त्यांचे मदतनीस, गर्भवती स्त्रीचा नवरा, सासू सासरे, यांनाही निदान केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेवून त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी आयएमए पुढाकार घेईल, अशी हमी त्यांनी दिली. डॉ. बी.एस.गर्ग, डॉ. दिलीप माने, डॉ. गंभीर, डॉ.जे.एल.शर्मा व डॉ. धामट यांनी तरतुदीबाबत माहिती दिली.