स्नेहालयच्या कुळकर्णी दाम्पत्याची आज प्रकट मुलाखत Print

वर्धा / वार्ताहर
देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी निरपेक्षपणे काम करणाऱ्या नगर येथील स्नेहालय संस्थेच्या गिरीश व प्राजक्ता कुळकर्णी या दाम्पत्यांचा आजवर झालेला प्रवास मंगळवार २३ ऑक्टोबर रोजी येथे उलगडणार आहे. गेले अनेक वर्षे हे दामप्त्य या क्षेत्रामध्ये काम कीरत असून त्यांना आतार्प़त आलेल्या चांगल्या तसेच वाईट अनुभवांचे पदरही त्यावेळी उलगडले जाणार आहेत. हा कार्यक्रम येथील  गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती देण्यात आली.