वसुंधरा मित्र व रक्षक पुरस्कार अकोलेकरांना Print

अकोला /प्रतिनिधी
अकोल्यात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण शिक्षण व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अमोल सावंत यांना वसुंधरा मित्र व वनरक्षक गजानन चव्हाण यांना वसुंधरा रक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात हे पुरस्कार अमरावतीते प्रदान केले.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण रुजविण्यात येथील अमोल सावंत यांचे योगदान मोठे असल्यानेच त्यांना वसुंधरा मित्र पुरस्कार देण्यात आला आहे. अकोट वनविभागातील अमोना बिटमधील वनरक्षक गजानन चव्हाण यांना महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नक्वी यांच्या हस्ते वसुंधरा रक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमोना व धारगड या गावांच्या पुनर्वसनात त्यांचे योगदान मोलाचे ठरले.