नाभिक समाजातील गुणवंतांचा ३१ ऑक्टोबर रोजी सत्कार सोहळा Print

चंद्रपूर /प्रतिनिधी
श्री संत गोपालकृष्ण व श्री संत नगाजी महाराज मंदिराच्या वतीने श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी बुधवारला आयोजित करण्यात आलेला आहे.
समाधी वॉर्डातील श्री संत नगाजी सभागृहात आयोजित या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती मोरेश्वर कडूकर राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील अभियंता मोरेश्वर अतकरे, दिलीप नक्षणे, अनिल वाटेकर, केशवराव चौधरी, राजू हनुमंते, रमेश खुरगे, वसंतराव बडवाईक, डॉ.लक्ष्मीकांत कडूकर, लक्ष्मणराव बडवाईक, डॉ. माद्देशवार, पगाडे, अ‍ॅड. अभिजीत किन्हेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहतील. उपमुख्याध्यापक दिवाकरराव किन्हीकर यांच्या स्मृतीनिमित्त दहावीत गुणानुक्रमे पहिल्या तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्मृतीचिन्ह, रामदास व ताराबाई वाटेकर यांच्या स्मृती निमित्ताने ४, १०, १२ वी व पदवी परीक्षेत पहिल्या तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. याकरिता समाजातील पात्र विद्यार्थ्यांनी त्यांची नावे, पासपोर्ट छायाचित्र, गुणपत्रिकेची झेरॉक्स, श्री संत नगाजी महाराज वसतीगृहाचे सचिव बाबाराव कडूकर, सरकार नगर, नवीन गजानन महाराज मंदिराजवळ, शंकरराव जुनारकर, सतशील चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड, श्यामराव उरकुडे, रत्नाकर वानकर यांच्याकडे २५ ऑक्टोबपर्यंत द्यावी, त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार करणार नाही, असे श्री संत नगाजी वसतीगृहाचे अध्यक्ष गोविंदराव किनगांवकर यांनी सांगतिले.