‘वैद्यकीय महाविद्यालय व खासगी डॉक्टरांचे सेतूबंधन आवश्यक ’ Print

प्राईमकॉन-२०१२ परिषदेचे उद्घाटन
वर्धा  /प्रतिनिधी
परिषदेचे उद्घाटन करतांना खासदार हंसराज अहीर.

वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी स्तरावर आरोग्यसेवा देणारे डॉक्टर यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात सर्वदूर वैद्यकीय सेवा देणे शक्य असल्याने या दोघांतील सेतूबंधन दृढ झाले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार हंसराज अहीर यांनी सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात आयोजित प्राईमकॉन २०१२ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात आयोजित या परिषदेच्या उद्घाटन समारोहाला माजी खासदार सुरेश वाघमारे, अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, कुलसचिव डॉ. राजीव बोरले, वैद्यक शाखेचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव उपस्थित होते. डॉ. मिश्रा यांनी आपल्या भाषणातून पुरावाजन्य वैद्यकशास्त्राचे महत्व विशद केले. ‘अतिदक्षतेतील काळजी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कार्यशाळेत डॉ. के.चूघ व डॉ. मिनहाज शेख (नवी दिल्ली), डॉ. कृष्णप्रसाद (हैदराबाद), डॉ. जय देशमुख (नागपूर), डॉ. दिलीप गोडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. सोबतच प्राथमिक सेवा आणि अतिदक्षतेतील काळजी याबाबत सावंगी रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. लाखकर, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. हरिहरन, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी येवला, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. राजेश दुलानी आणि मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सतीश महाजन यांनी मार्गदर्शन केले.  परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सुरक्षित मातृत्वावर डॉ. नीमा आचार्य, संधिवाताबाबत डॉ. प्रदीप सिंग, चेहऱ्यावरील दुखापतीवर मुख शल्यचिकित्सक डॉ. राजीव बोरले, रुग्णालयातील स्वच्छतेवर डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. ‘घनकचऱ्याचे व्यवस्थापन’ या विषयावर परिषदेच्या तिसऱ्या दिवशी परिचर्चा घेण्यात आली. या तीन दिवसीय परिषदेत ग्रामीण भागातील डॉक्टरांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग लाभला.