जगन्नाथपुरीत भागवत ज्ञानयज्ञ
|
|
अकोला / प्रतिनिधी द्वारकेतील भागवत यज्ञानंतर आता जगन्नाथपुरी येथे ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान भागवत ज्ञानयज्ञ होणार आहे, अशी माहिती गदाधर शास्त्री दिली. बारी मोंहती व पुरी येथील पंडय़ा छोटय़ा कुळकर्णी यांच्या आग्रहास्तव मराठीतून भागवत करण्यात येत आहे.
या कथेदरम्यान जगद्गुरू शंकराचार्य महाराज गोवर्धनपीठ पुरी यांच्या वैदिक पाठशाळेतील श्रीकुमार शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली विष्णुयाग होणार आहे. ज्या भाविकांना भागवतयज्ञात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. |