आयुर्वेद भूषण पुरस्कारांचे वितरण Print

यवतमाळ / वार्ताहर
आयुर्वेद भारताची सर्वोत्तम प्राचीन चिकित्सा पध्दती असून आयुर्वेदाच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत आहे. गंभीर आजारावर सुध्दा आयुर्वेद उपचार चिकित्सा उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे केले.
डी. एम. आयुर्वेद महाविदयालयात डॉ.भाऊसाहेब पदमावार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित आयुर्वेद भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात मोघे बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद कळणावत होते. या प्रसंगी डॉ. सुभाषचंद्र वाष्र्णेय यांचा शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना डॉ. सुभाषचंद्र वाष्र्णेय यांनी आयुर्वेद उपचार चिकित्सा ही भारताची जगाला मिळालेली देण असल्याचे सांगितले.
डॉ.राजीव मुंदाने यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. डॉ. केदार राठी, डॉ. अशोक गिरी, डॉ.सुरेंद्र पदमावार, डॉ.सूर्यप्रकाश जयस्वाल यांचीही यावेळी भाषणे झाली. आभार प्रदर्शन डॉ.लक्ष्मीनिवास सोनी यांनी केले.