माहुरवासिनीसह अन्य रेणुका मंदिरे गर्दीने फुलली Print

देवी महिमा
यवतमाळ / वार्ताहर
alt

नवदुगरेत्सवात माहुरवासिनी रेणुकेच्या दर्शनासाठी उभ्या महाराष्ट्रातून भक्तांची मांदियाळी लागत असली तरी यवतमाळ जिल्ह्य़ात रेणुकेचीच आणखीही काही शक्तीपीठेआहेत. त्या ही ठिकाणी गुजरात, मध्यप्रदेश, आंघ्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भ इत्यादी ठिकाणाहून देवी भक्तांचे लोंढे येत आहेत.
विशेष बाब ही की, रेणुकेची ही शक्तीपीठे उंचच्या उंच टेकडय़ांवर आणि वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात आहेत.उल्लेखनीय म्हणजे रेणुकेची सर्व मंदिरे हेमाडपंथी पद्धतीची असून निसर्गरम्य परिसरात आहेत. सर्व ठिकाणी दत्त, अनसूया, हनुमान, शिव, गणेश आदी देवीदेवतांची मंदिरे असुन हा ऐतिहासिक व पौराणिक वारसा जतन करण्याची भविकांची श्रघ्दा आहे. त्यामुळे नवदुगरेत्सवातील ९ दिवस या सर्व रेणुका मातांच्या मंदिरात गर्दी असते, माहूर हे गाव यवतमाळ व नांदेड जिल्ह्य़ाच्या सीमारेषेवरील पैनगंगा नदीच्या तिरावर वसलेले आहे, ममत्र गंमत अशी की, माहूर हे गाव नांदेड जिल्ह्य़ात असले तरी अनेकांचा समज ते यवतमाळ जिल्ह्य़ातच आहे, असा आहे. या जिल्ह्य़ात चिंतामणीच्या कळंब शहराजवळ माहूर नावाचे गाव असून ते दत्तापूर माहूर म्हणून प्रसिध्द आहे. आता ते पर्यटन क्षेत्र होत आहे.
 या जिल्ह्य़ात पुसद शहरात रेणुकेचे मंदिर आहे, तर नेरपासून ५ किलोमिटर अंतरावर रेणुकापूर येथे रेणुकेचे मंदिर आहे. उमरखेड तालुक्यात मुळावा येथेही रेणुकेचे मंदिर फार प्रसिध्द आहे. याच तालुक्यात गुंज गावातही एका भव्य टेकडीवर रेणुकेचे मंदिर आहे. ही सर्व मंदिरे भक्तांची श्रद्धास्थाने आहेत. माहुरवासिनी रेणूकेइतकीच श्रध्दा अन्य रेणूका मंदिरात देखिल या काळात पहायला मिळते.