३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय संकल्पदिन Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय संकल्प दिन आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी मेळावे, रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. यात राष्ट्रीय गीते, देशभक्तीपर गीते, भाषण आणि इंदिरा गांधींच्या भाषणातील उतारे वाचणार आहेत.