सुधाकर संघवार यांचे चित्रप्रदर्शन Print

वाशीम / वार्ताहर
स्थानिक युवा कलावंत सुधाकर नारायणअप्पा संघवार यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील प्लाझा आर्ट गॅलरी येथे २२ ते २८ ऑक्टोबपर्यंत भरले आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.
संघवार यांचा जलरंग या माध्यमात हातखंडा असून त्यांनी वेरुळ, चित्तोडगड, राजस्थान, बनारस, ओंकारेश्वर येथे साकारलेल्या कलाकृती  प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द चित्रकार शिवाजी तुपे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नाशिकच्या चित्रकर्ती मुक्ता बालिका उपस्थित होत्या. सुधाकर संघवार यांनी निसर्गचित्राचे जिवंत चित्रण कलाकृतींमध्ये आहे.  संघवार नामवंत चित्रकारांसोबत सतत शिबिरांत सहभागी असतात. त्यात वासुदेव कामत, प्रफुल सावंत, बालिका मुक्ता यांचा समावेश आहे. या प्रदर्शनातील  कलाकृती जलरंग व एॅकरॅलिक रंग माध्यमामधील आहेत.