समृद्धी पतसंस्थेला आदर्श संस्थेचा पुरस्कार Print

वाशीम/वार्ताहर
समृध्दी पतसंस्थेला २०११-१२ चा जिल्ह्य़ातून आदर्श पतसंस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दरवर्षी विदर्भ क्रेडिट को-ऑप सोसायटीज फेडरेशन लिमिटेड अमरावतीच्या वतीने आदर्श पतसंस्था स्पर्धा जिल्हा व विदर्भस्तरावर आयोजित केली जाते.  गेल्या आíथक वर्षांत संस्थेच्या आíथक पत्रकाचे निरीक्षण करून गुणदान केले जाते. ही स्पर्धा एकूण ४०० गुणांची असते. अनेक पतसंस्था यात सहभागी होतात. वाशीम येथील समृध्दी नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थेने या स्पध्रेत भाग घेतला होता. अमरावती येथे २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात या स्पध्रेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात वाशीम जिल्ह्य़ातून समृध्दी पतसंस्थेला जिल्हास्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला. या संस्थेला ४०० पकी ३०० गुण मिळाले. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बागडे यांनी स्वीकारला.  प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.