दुसरे उलगुलान वेध साहित्य संमेलन भंडाऱ्यात Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
आदिवासी साहित्य जागर व जतन अकादमीतर्फे प्रायोजित दुसरे आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन भंडारा येथे १७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे डॉ वासुदेव गुलाटे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ वासुदेव गुलाटे यांची ग्रामीण साहित्यिक, समीक्षक अशी महाराष्ट्राला ओळख आहे. अनेक कादंबऱ्या, समीक्षाग्रंथ आणि कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा व पुणे विद्यापीठात मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक साहित्य संमेलनातही त्यांनी अनेक पदे भूषवली आहे. औरंबाद येथील स्वरूप प्रकाशन संस्था डॉ गुलाटे चालवत आहेत. साहित्य संमेलनात डॉ विनायक तुमराम यांच्या आदिवासी साहित्य अंतरंग आणि आकलन, सुनील कुमरे यांचा ‘भेटतो व्रतस्थ वाटसरू जेव्हा’ आणि प्रा वामन शेळमाके यांचा आदिवासी पंचकवी, पितांबर कोडापे यांचा उरस्कल हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे.