बालाजी संस्थानचा वार्षकोत्सव सुरू Print

वाशीम / वार्ताहर
वाशीमकरांचे आराध्य दैवत असलेल्या येथील बालाजी मंदिरात बालाजी संस्थानच्या वतीने आयोजित वार्षकिोत्सवास १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून हा उत्सव ३० ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती बालाजी संस्थानचे विश्वस्त ज्ञा. ना. काळू यांनी दिली.
या धार्मिक उत्सवात ध्वजारोहण, कीर्तन, प्रवचन, भजन, रथोत्सव, गायन, श्रींच्या पालखीची मिरवणूक, महाप्रसाद व गोपालकाला आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. नवरात्रीनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यास १६ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने प्रारंभ झाला . १७ ते २१ ऑक्टोबपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत म.वा. दीक्षित यांचे कीर्तन झाले. सोमवारी दुपारी ४ वाजता येथील चामुंडादेवी संस्थानच्या वतीने परकर अर्पण करून पूजन झाले. बुधवारी विजयादशमीनिमित्त सायंकाळी ५ वाजता श्रींच्या प्रतिमेची पालखीतून शहरामध्ये शोभायात्रा काढली. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता बालाजी महिला भजनी मंडळाचे भजन व रात्री ९३० वाजता पुणे येथील राजेंद्र दीक्षित यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. शनिवारी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  मंगळवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गोपालकाल्याचा कार्यक्रम व कीर्तनानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. याशिवाय, नियमित कार्यक्रमांमध्ये २६ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबपर्यंत दररोज सकाळी ५.३० वाजता काíतक मास काकडआरती होणार असून २८ नोव्हेंबर रोजी सकाळी काíतक मास काकडआरती समाप्तीनंतर सायंकाळी गोपालकाल व चंद्रोदय समयी त्रिपूर प्रज्वलन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्तांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बालाजी संस्थानचे विश्वस्तांनी केले आहे.