सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्रात अनियमितता नसल्याचा दावा Print

अकोला / प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्य़ातील सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्रात अनियमितता नसल्याचा दावा कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रा.रविंद्र वाघमारे यांनी केला आहे.
दरम्यान, वाघमारे यांनी त्यांची बदली विद्यापीठाच्या  आवश्यकेनुसार विनंती बदली असल्याचे स्पष्ट केले, तसेच या सिंदेवाही येथील काही प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे मान्य केले. या संबंधीचे कागदपत्रे अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी नेल्याचा दावा त्यांनी पत्रात केला .
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे चंद्रपूर जिल्ह्य़ातील सिंदेवाही येथे कृषी विज्ञान केंद्र आहे. येथे अनियमितता नसल्याचा दावा या केंद्राचे समन्वयक डॉ. प्रा. रविंद्र वाघमारे यांनी पत्राद्वारे केला. त्यांनी पाठविलेल्या पत्रात कॅशबुक नोंदी अपूर्ण असल्याचे मान्य केले, तसेच ११ व १२ ऑक्टोबर रोजी अकोला येथील एका चमूने कागदपत्रांची तपासणी केल्याचीही बाब त्यांनी मान्य केली, सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रवास भत्ता, शेतीशाळा, जेवण, प्रशिक्षण यात कुठलीही अनियमितता नाही. तसेच सिंदेवाहीच्या विज्ञान केंद्रातील सर्वच वस्तू या तेथेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.