गडकरींचे वध्र्यातील सर्व कार्यक्रम रद्द Print

वर्धा / प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
आरोपांच्या फै रींमुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आगामी दोन दिवसातील वर्धा जिल्ह्य़ातील कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्त्यांवर निराशेचे मळभ पसरले आहे.

सेलू तालुक्यातील तामसवाडा येथे पूर्ती जलसिंचन संस्थेतर्फे  पाणी परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. याप्रसंगी खुद्द गडकरी तसेच मंत्री नितीन राउत यांची उपस्थिती राहणार होती. मात्र ही परिषद काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे पूर्तीचे संचालक माधव कोटस्थाने यांनी नमूद केले.
राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापूर्वीपासूनच गडकरी यांचे वर्धा जिल्हयावर विशेष लक्ष राहले. सेलूच्या दिनकरनगरातील महात्मा सहकारी साखर कारण्याना त्यांनी लिलावात विकत घेवून चालवायला घेतला. त्यासोबतच पूर्ती जलसिंचन सहकारी संस्थेतर्फे  तामसवाडा येथे गावच्या बंधाऱ्यावर जलसिंचन प्रकल्पही सुरू केला. त्याच ठिकाणी शुक्रवारचा कार्यक्रम होता. तो रद्द झाल्याने व त्यामागचे नेमके कारण जाणून असल्याने पदाधिकारी तसेच पक्षकार्यकतै निराश झाले आहे.
महात्मा साखर कारखान्याचा गळीत हंगामही पुढील आठवडयात दरवर्षी प्रमाणे अपेक्षित आहे. मात्र त्या    कार्यक्रमाची तारीखही अद्याप निश्चित न होण्यामागे गडकरींवरील  आलेल्या संकटाचेच कारण दिल्या जात आहे.