शिकार व अन्य माहिती देणाऱ्या खबऱ्यांना यापुढे मदत देणार Print

प्रतिनिधी / चंद्रपूर
राज्यपालांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी दिली असून आता राज्य शासनास शिकार आणि इतर माहिती देणाऱ्या संबंधित खबऱ्यांना गुप्तसेवा निधी अंतर्गत मदत दिली जाणार आहे, तसेच जंगलव्याप्त गावात पोलीस पाटलाच्या धर्तीवर वनपाटील नेमले जाणार आहेत.  इको-प्रोने ही मागणी लावून धरली होती. मुंबई मंत्रालयात १० ऑक्टोबरला झालेल्या बैठकीपूर्वीच हा निर्णय घेऊन इको-प्रोला तसे कळविण्यात आले. बैठकीत प्रधान सचिव प्रवीण परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक के. जोशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी व अन्य वरिष्ठ वनाधिकारी व इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, धीरेंद्र मुलकवार उपस्थित होते.