दूधसंकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना अटक Print

भंडारा/वार्ताहर  
दूध संकलन केंद्राच्या नोंदणीसाठी साडेचार हजार रुपये लाच स्वीकारताना दूध संकलन, तसेच विस्तार पर्यवेक्षक अधिकारी विनोद गणपत पंचभाई याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  जवाहरनगरजवळच्या पेवठा या गावातील अंकुश विठ्ठल वंजारीला गावात दूध संकलन केंद्र सुरू करायचे होते. त्यासाठी तो नोंदणी करण्यास गोंदिया येथील कुडवा येथील जिल्हा दुग्ध अधिकारी कार्यालयात गेला. तेथे दूध संकलन, तसेच पर्यवेक्षक अधिकारी विनोद गणपत पंचभाई याने रजिस्ट्रेशनसाठी साडेचार हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे अंकुश वंजारीने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात शुक्रवारी तक्रार दाखल केली. विनोद पंचभाईला कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या चहाच्या टपरीत लाच स्वीकारत असताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात भंडारा पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. ही कार्यवाही एसीबीचे पोलीस उपायुक्त निशिथ मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक अशोक देवतळे, सहायक फौजदार हेमंतकुमार उपाध्याय, हवालदार महेंद्र सपाटे, मनोज मेश्राम, मनोहर गभणे, राजेश ठाकरे, मनोज चव्हाण सहभागी होते.