आर्णीत दसऱ्याच्या दिवशी ८५० क्विंटल कापूस खरेदी Print

यवतमाळ/वार्ताहर
आर्णी येथील बालाजी जिनिंग व प्रेसिंगमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला. दिवसभरात ८५० क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती बालाजी जिनिंगचे संचालक बाळासाहेब निलावार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ४१०० रुपये भावाने कापूस खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची हमी सुद्धा निलावार यांनी दिली. विशेष म्हणजे, कोणतीही कपात न करता थेट पेमेन्ट शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था या जिनिंग फॅक्टरीच्या संचालकांनी केली. अंदाजे ३५ लाखाच्या  कापसाची एका दिवसात खरेदी झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कापूस खरेदीच्या मुहुर्तावर बाळासाहेब निलावार, दिलीप चिंतावार, श्रीनाथ मोतेवार, गजानन बुक्कावार, गोपाल कोठारी, गजानन कोषटवार, बिंदुशेठ अग्रवाल,कबर अली व बलदेव उपस्थित होते.