रावणवाडी ठाण्यात तिघांवर ‘अॅट्रासिटी’चा गुन्हा दाखल Print

गोंदिया / वार्ताहर
गोंदिया तालुक्यातील सावरी येथे शेतातील पाण्याचा बांध फोडल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या भांडणात जातीवाचक शिवीगाळ करून शेतकऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. फिर्यादी सुरेश पांडुरंग सहारे हे सकाळी आपल्या शेतात गेले असता, शेतातील पाणी असलेल्या बांधातील एक बाजू फोडल्याचे लक्षात आले. दरम्यान, काही वेळाने ते घरी जाण्यास निघाले असता आरोपी गुल्लू हरी पटले, जीवन बिसराम पटले, मुकेश रूपचंद पटले हे परिसरात भेटले असता, फिर्यादीने त्यांना विचारपूस केल्यावर आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.