अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांगलवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अशोक कुकचु कन्नाके याने दीपक नारायण कचिनवार याची डोक्यावर काठीने मारून हत्या केली. याप्रकरणी पोलीस पाटील नलेश भोयर यांच्या तक्रारीवरून अशोक कन्नाके याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.