‘दहशतवादाची ऊर्जा आणि राजकारण’ विषयावर शनिवारी व्याख्यान Print

प्रतिनिधी / अकोला
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बाबूजी देशमुख नवरात्र व्याख्यानमालेत दै.लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे शनिवारी येथे व्याख्यान होणार आहे. ‘दहशतवादाची ऊर्जा आणि राजकारण’ या विषयावर शनिवारी, सायंकाळी ६ वाजता येथील प्रमिलाताई ओक सभागृहात हे व्याख्यान होईल.
येथील बाबूजी देशमुंख वाचनालयामार्फत दरवर्षी नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा या व्याख्यानमालेचे ६७ वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेत यंदा नामवंत वक्त्यांचा सहभाग आहे. शुक्रवार, २ नोव्हेंबर रोजी या व्याख्यानमालेत दै. लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांचे व्याख्यान होणार आहे. ‘महाराष्ट्राची संस्कृती खुजी का झाली?’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी दै. लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान होईल. बाबूजी देशमुख वाचनालयाची नवरात्र व्याख्यानमाला येथे सुरु आहे. या व्याख्यानांसाठी रसिक जाणकार श्रोत्यांची संख्या रोज सतत वाढत आहे, अशी माहिती बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार व सचिव अनुराग मिश्र यांनी दिली.