बुलढाणा अर्बन गरबा महोत्सवाची थाटात सांगता Print

प्रतिनिधी / बुलढाणा
बुलढाणा अर्बन गरबा महोत्सवाचा अतिशय उत्साहपूर्ण व रंगारंग वातावरणात समारोप करण्यात आला. स्थानिक डॉ. डी.सी. गुप्ता नगरपालिका शाळेच्या प्रांगणावर नवरात्रोत्सवानिमित्त बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने बुलढाणा अर्बन गरबा कलावंतांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या सोहळ्याला बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, संचालक राजेश देशलहरा, बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार भाले, महोत्सवाच्या अध्यक्ष कोमल झंवर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. जितेंद्र कोठारी, मार्गदर्शक अनंता देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.  
प्रारंभी गरबा आयोजन समितीच्या वतीने सुधीर भालेराव, संजय कस्तुरे, उमेश अग्रवाल, मोहन दलाल यांच्या हस्ते अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड. कोठारी यांनी केले. बुलढाणा अर्बन परिवाराने शहराला सतत काही ना काही नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांंपासून गरबा फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन करून बुलढाणा अर्बन परिवाराने शहर परिसरातील गरबा कलावंतांना व्यासपीठ व कला सादर करण्याची संधी दिली, असे आमदार विजयराज शिंदे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालगटात पहिल्या पंधरा गरबा कलावंतांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यात कोमल मिश्रा, रक्षा कोठारी, साक्षी लाहोटी, नेहा बाफना, ऐश्वर्या व्यास, रूजुला मुंदडा, अनुष्का बुरड, आदिती गहरवार, वैष्णवी लाहोटी, नेहा श्रीवास्तव, रोषण मुंदडा, प्रकाश बोरले, संयम पाटणे, निश्चय देशलहरा, मध्यम गटातील प्रथम दहा मुलांमध्ये विशाल शेळके, गौरव टाकसाळ, मयूर पवार, विशाल चितळे, आकाश देशलहरा, विजय बुटे, संदीप चंदन, अभिषेक मोरे, स्वप्नील भंसाली, रितेश जयस्वाल, तर मध्यम गट प्रथम पंधरा मुलींमध्ये नेहा पाटील, मेधा पाटील, अनामिका पवार, शिवानी कस्तुरे, रोशनी जंजाळकर, पूजा छाजेड, तेजस्विनी बुटे, पूजा काळवाघे, हेमा शर्मा, आरती शर्मा, अंजली परांजपे, पायल देशलहरा, पल्लवी सोनुने, वर्षां कायस्थ व स्वप्ना पवार यांनी पारितोषिक पटकाविले.