अंत्यविधीसाठी गेलेल्याचा वैनगंगेत बुडून मृत्यू Print

चंद्रपूर/प्रतिनिधी
अंत्यविधी आटोपल्यानंतर वैनगंगा नदीत स्थान करण्यासाठी गेलेल्या दिवाकर बोम्मनवार (४८) यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी दोन वाजताची आहे.
नांदगांव येथील भय्याजी नार्लावार यांचा सोमवारी मृत्यू झाला. काल दुपारी नार्लावार यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे शेजारी दिवाकर बोम्मनवार गेले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर आंघोळीसाठी म्हणून ते नदीच्या पात्रात उतरले. पोहता पोहता बोम्मनवार खोल पाण्यात निघून गेले. नदीच्या मध्यात पाणी अधिक असल्याने तिथून त्यांना परत येता न आल्याने बुडून मृत्यू झाला.