जनता महाविद्यालयातील चौघांची सदस्यपदी निवड Print

अकोला/ प्रतिनिधी
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येथील जनता होमिओपॅथिक महाविद्यालयातील चार जणांची विविध सदस्यपदी निवड झाली. इतक्या मोठय़ा संख्येत प्रथम निवड होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
विद्यापीठाच्या होमिओपॅथिक अभ्यास मंडळावर राज्यातील १२ प्राचार्यापैकी जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर मालोकार आणि होमिओपॅथिक कॉलेज खामगावचे प्राचार्य दादासाहेब कवीश्वर यांची निवड झाली आहे.
अमरावती विभागीय सर्व फॅकल्टी (आरोग्य) प्राध्यापकांमधून जनता होमिओपॅथिकचे प्रा. डॉ. अनिल वाकोडे यांनी विजय मिळविला. तसेच प्रा.डॉ. सुनिता जैन (प्री क्लिनिकल), प्रा. डॉ. मिनल राऊत (क्लिनिकल) बोर्डावर बिनविरोध निवडून आल्या आहे.
प्री क्लिनिकल बोर्डावर तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. किशोर मालोकार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.