वाशीमला नोव्हेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुका Print

वाशीम/वार्ताहर
येत्या डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.
यात वाशीम तालुक्यातील ५२, रिसोड तालुक्यातील ४५, मालेगाव तालुक्यातील ४८, मंगरूळपीर तालुक्यातील ४४, मानोरा तालुक्यातील ४१ आणि कारंजा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय मानोरा तालुक्यातील ७ आणि कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायत, अशा एकूण ११ प्रभागातील निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी ७ ते ११ नोव्हेंबपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. १२ नोव्हेंबर रोजी छाननी आणि १६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेऊन उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
 जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकत्रे योग्य उमेदवाराच्या शोधात असून प्रत्येक ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राहण्यासाठी तयारीला लागल्याचे वृत्त आहे.  होते.