अजितदादा १७ नोव्हेंबरला यवतमाळ दौऱ्यावर Print

यवतमाळ / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा १७ नोव्हेंबरला पुसद येथे आयोजित करण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
उपमुख्यमंत्रीपदावर पाणी सोडल्यानंतर अजितदादा पवार प्रथमच यवतमाळ जिल्ह्य़ात येत आहेत. त्यांचा भव्य सत्कार करण्याची तयारी राकाँ नेत्यांनी केली असून अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी आमदार संदीप बाजोरीया
यांच्या पक्ष कार्यालयात एक बैठक घेऊन दादांच्या स्वागतासाठी
जय्यत तयारी करा, असा आग्रह कार्यकर्त्यांना केला.
आमदार संदीप बाजोरीया व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दादांचे
स्वागत जिल्हाभरच नव्हे, तर विदर्भात चर्चेचा विषय व्हावा, एवढे भव्य झाले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार संदीप बाजोरीया यांनी यावेळी व्यक्त केली.