भारत विद्यालयाचा क्रिकेट संघ विभागीय स्तरावर Print

बुलढाणा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनाद्वारा आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रिकेट स्पध्रेत भारत विद्यालयाचे तिन्ही संघ जिल्हास्तरावर अजिंक्य ठरले असून या तिन्ही संघाची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा खामगाव, बुलढाणा व मलकापूर येथे पार पडल्या.
यानिमित्त भारत विद्यालयाच्या ५० खेळाडूंना डॉ. सचिन राठोड यांनी कॅ प दिल्या. या तिन्ही संघाचे व मार्गदर्शक शिक्षक संजय देवल यांचे हर्षवर्धन आगाशे, प्राचार्य विलास देशमुख, उपप्राचार्य शालकराम उन्हाळे, पर्यवेक्षक शिंदे, क्रीडाधिकारी गणेश जाधव, चांदुरकर, चंद्रकांत साळुके यांनी  संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना  शुभेच्छा दिल्या.