लाच घेताना लिपिकास अटक Print

गोंदिया / वार्ताहर
तिरोडा नगर पालिकेतील देवाजी पांडूरंग तिवडे कर्मचाऱ्याला एक हजार रुपयाची लाच घेताना ३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडले.
तिरोडा येथील संतोष महादेव बरबटे हे वडिलोपार्जित घराच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामाची पालिकेकडून रितसर परवानगी घेण्यासाठी चकरा मारत आहेत, मात्र बांधकामाच्या परवानगीसाठी तिवडे हे लाच मागत होते. अखेर बरबटे यांनी ११ सप्टेंबर रोजी लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत खात्याने  सापळा रचून कर्मचाऱ्याला हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक देवतळे, पोलीस हवालदार मनोज मेश्राम यांनी केली.