चोरटय़ाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा Print

बुलढाणा/ प्रतिनिधी
राहुल ऑटो पार्टस्मध्ये चोरी करणाऱ्याला चार वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजार रुपयांचा आर्थिक दंडाची  शिक्षा मलकापूर न्यायालयाने ठोठावली आहे.
मयूर जैन यांच्या दुकानातून प्रशांत पवार (रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) याने ५ हजार ६०० रुपयांचा माल चोरून नेला होता. याबाबतची फिर्याद मयूर जैन यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, तपास अधिकारी पिंजरकर यांनी आरोपीकडून तपासादरम्यान माल जप्त केला होता.  या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एस.व्ही.कासार यांनी एकूण ५ साक्षीदार तपासले होते. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपी प्रशांत मनोहर पवार यास न्यायदंडाधिकारी श्वेता एन.चांडक यांच्या न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची सुनावली आहे.