सेंटर आयुर्वेद व केरला पंचकर्म केंद्राचे उद्घाटन Print

गोंदिया/वार्ताहर
गोंदिया शहराला आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा देण्याकरिता सेंटल हॉस्पिटल येथे सेंटल आयुर्वेद व केरला पंचकर्म केंद्राचे उद्घाटन नुकतेच गोंदियातील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महादेवराव शिवणकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संचालक सुरेश कटरे, गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक राधेलाल पटले उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अनवर सिद्दीकी म्हणाले की, या आयुर्वेद केंद्राद्वारे आम्ही उच्चतम आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा गोंदिया नगरवासीयांना अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार आहोत. या केंद्रातून गोंदिया आणि जवळील ग्रामीण परिसरातील असाध्य रुग्णांना आमच्याकडून उत्तम सेवा दिली जाईल याबाबतची हमी आम्ही रुग्णांना देऊ.
उद्घाटक आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की, आयुर्वेद ही आमची फार जुनी चिकित्सा पद्धती आहे. ज्यांवर अनेकांचा आजही विश्वास आहे. आता ही आधुनिकरीत्या आमच्या समोर येत असून यावर पण रुग्णांना विश्वास करावा येथील
गुणवंत डॉक्टर रुग्णांना उच्चतम दर्जाची सेवा देतील, अशी आशा बाळगली.
याप्रसंगी डॉक्टर पंकज पटले, डॉ.अनवर सिद्दीकी, डॉ. स्मिता भरणे यांना त्यांनी त्यांच्या स्वर्णिम भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभात डॉ. एल.डी. बजाज, डॉ. बजाज, डॉ. शिबु आचार्य, डॉ. मोहरकर, डॉ. संजय ज्ञानचंदानी, डॉ. उमेश शर्मा, गोंदियातील काँग्रेसचे नेते अमर वराडे, जलीलभाई पठाण आदी उपस्थित होते.