तलावात बुडून युवकाचा मृत्यू Print

बुलढाणा/प्रतिनिधी
वडिलांसह आंघोळीला गेलेल्या २४ वर्षीय युवकाचा रायपूर नजीकच्या डासाळवाडी येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
जालना जिल्ह्य़ातील गोंदला येथील नाथा रंगनाथ साळवे व त्यांचा मुलगा  मुलगा अनिल नाथा साळवे सकाळी डासाळवाडी येथील तलावावर स्नान करण्यासाठी गेले होते.
अनिल आंघोळीसाठी पाण्यात उतरला. अनिलने पाण्यात डुबकी घेतल्यानंतर तो बुडाला आणि  मरण पावला असल्याची फिर्याद त्याचे वडील नाथा साळवे यांनी रायपूर पोलीस ठाण्यात दिली.