धरम दावने हत्या प्रकरणी दोघा जणांना अटक Print

गोंदिया/वार्ताहर
उड्डाण पुलाखालील शक्ती चौकात पशाच्या वादातून गोळ्या घालून धरम शंकरलाल दावने या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी काल सायंकाळच्या सुमारास अटक केली, तसेच हत्येकरिता वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे.
शहरातील धरम शंकरलाल दावणे (३०, रा. दसखोली) या तरुणाची देशी कट्टय़ातून गोळा घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती. यानंतर रामनगर पोलिसांनी नईम व बाबा या दोन आरोपींना ताब्यात घेतले. तसेच हत्येकरिता वापरलेले पिस्तूल गोंदिया तालुक्यातील सावरी येथे बसथांब्याच्या छतावर फेकले असल्याचे या दोन्ही आरोपींनी पोलिसाना सांगितले. पोलिसांनी सावरी येथून पिस्तूल जप्त केले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपी गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी केली.