कॉंग्रेसचे गिंडगु रुद्रा राजू शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर Print

चंद्रपूर  / प्रतिनिधी
येणाऱ्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक व गडचिरोली मतदार संघाची तयारी करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे दिल्लीतील निरीक्षक गिंडगु रुद्रा राजू येत्या ९ नोव्हेंबरला चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत.
राजू शुक्रवारी सकाळी  ९ ते १२ या वेळेत शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांसोबत भेट व चर्चा करणार आहेत. स्थानिक तालुक्यातील कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेल व विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक तालुका अध्यक्ष चंद्रकांत गोहोकर यांनी केले आहे.