देशीकट्टय़ासह एकास अटक Print

चंद्रपूर / प्रतिनिधी  
रमाबाई नगरातील एजाज हुसेन मेहबुब हुसेनला देशीकट्टय़ासह  पोलिसांनी अटक केली.रामनगरचे ठाणेदार पी.डी.मडावी यांना मिळालेल्या माहितीनुसार घुग्घुस येथून जवळ शेणगाव येथे वास्तव्याला असलेल्या बिहारातील एजाज हुसेन याचेकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली. कट्टय़ाचा धाक दाखवून हुसेन हा परिसरातील लोकांकडून पैसे घेत असल्याचे कळले. त्यानुसार मडावी यांनी त्याला अटक केली. या देशीकट्टय़ाची  किंमत दहा हजार रुपये आहे.