गडचांदूर ग्रा.पं.वर पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा Print

चंद्रपूर / प्रतिनिधी  
गडचांदूर ग्राम पंचायतवर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून सरपंचपदी शोभा मडावी, तर उपसरपंच पापय्या पोन्नमवार निवडून आले.सतरा सदस्य संख्या असलेल्या ग्राम पंचायतीत कॉंग्रेसला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या होत्या.
गडचांदूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या शोभा मडावी यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माया मेश्राम यांचा ५ मतांनी पराभव केला. शोभा मडावी यांना अकरा, तर माया मेश्राम यांना सहा मते मिळाली.
याच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत देखील कॉंग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे पापय्या पोन्नमवार विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे दामोदर केराम यांचा पाच मतांनी पराभव केला.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्या कांबळे, शेतकरी संघटनेच्या छाया नागभिडकर यांच्या पाठिंब्यामुळे कॉंग्रेसचा झेंडा फडकला.  विजयी उमेदवाराची मोठय़ा उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.