‘स्नेहांकीत’चा दिवाळी पहाट कार्यक्रम ११ नोव्हेंबरला Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
‘स्नेहांकीत’ या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पहाटे ५.३० वाजता हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमात नाशिककर कलावंत आपल्या सुरावटींची रांगोळी रेखतील. चंद्रपूरकर रसिकांना विनंती आहे की, त्यांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत व जम्मत वाढवावी.  कार्यक्रमानंतर अर्थात, दिवाळी फराळाची गंमत उपस्थितांना घेता येणार आहे.  दरवर्षी प्रमाणे कार्यक्रमाला पारिवारीक शुल्क ठेवण्यात आले आहे.
 या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्नेहांकीतच्या वतीने करण्यात आले आहे.