अनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचे हैदराबादला प्रदर्शन Print

प्रतिनिधी
राजस्थानातील आदिवासी चित्रांच्या माध्यमातून आता नगरमार्गे थेट हैदराबादला (आंध्रप्रदेश) येथे पोहचतील. नगरच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांची ही चित्रझेप आहे. हैदराबादच्या नोवोटेल या पंचतारांकित हॉटेलच्या कलादालनात त्यांच्या या चित्रमालिकेचे प्रदर्शन होत आहे.
गेल्या काही वर्षांंत चित्रकलेच्या क्षेत्रात सातत्याने चर्चेत असलेल्या श्रीमती ठाकूर यांची ओळख आता नव्या शैलीने आदिवासींचे जीवन चित्रबद्ध करणाऱ्या चित्रकार अशीच झाली आहे. काळ्या-पांढऱ्या रंगांबरोबरच आता त्यांनी इतर रंगांचा वापर करतही आपली ही आदिवासी चित्रमालिका खुलवली आहे. मात्र, त्यातही पुन्हा काळ्या रंगाचा मनसोक्त वापर ही आपली ओळख त्यांनी कायम ठेवली आहे. हैदराबादला २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर इतका प्रदीर्घ काळ त्यांचे हे चित्रप्रदर्शन असणार आहे. परराज्यात प्रदर्शन होणाऱ्या त्या नगरमधील एकमेव चित्रकार आहेत.