आत्मारामगिरींच्या प्रकृतीत सुधारणा Print

कर्जत/वार्ताहर
तालुक्यातील मांदळी येथील आत्मारामगिरी महाराज यांना अन्ननलिकेचा त्रास होऊ लागल्याने नगर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याने भाविकांनी रूग्णालयात दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ट्रस्ट कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आत्मारामगिरी महाराज मांदळी येथे अनेक वर्षांपासुन समाधी अवस्थेत आहेत. रोज राज्यभरातून हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात. एकादशीला तर राज्यभरातून दिंडय़ा येत असतात. आज एकादशी असल्याने गर्दी झाली होती. परंतु महाराजांना नोबल येथे उपचारासाठी नेल्याचे समजताच भाविक मोठय़ा संख्येने तिथे जमले होते व गर्दी वाढत होती. भाविकांची मोठी संख्या असल्याने शेवटी पोलिसांना गर्दी नियंत्रणासाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात रांगेत सर्वाना दर्शनासाठी सोडण्यात आले.