बंद घरातून २० हजारांची चोरी Print

श्रीरामपूर/प्रतिनिधी
शहरातील वॉर्ड नंबर १ मधील गोपाळनगरमधील विनीत कोपनर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ांनी सुमारे २० हजारांचा ऐवज लंपास केला.
कोपनर हे खासगी नोकरीनिमित्त संगमनेर येथे राहतात. दि. १८ ऑक्टोबर रोजी ते घरी नसताना रात्री अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून भारत गॅसच्या दोन टाक्या, टीव्ही, इन्व्हर्टर असा २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.